कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात अंकुर, वीर संताजी विजयी

अरुण क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात अंकुर स्पोर्ट्स क्लबने वारसलेनचा 52-27 असा 25 गुणांनी पराभव केला. तसेच वीर संताजीने जय दत्तगुरू संघाचा 28-16 असा 12 गुणांनी पराभव केला. ‘ब’ गटात अष्टविनायक मंडळाने विजय बजरंगचा 26-19 असा 7 गुणांनी पराभव केला. वीर नेताजी संघाने खडा हनुमान संघाचा 24-21 असा 3 गुणांनी पराभूत केले. अक्षय जगताप, आदित्य चव्हाण, अभिषेक रसाठ हे वीर नेताजीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पराभूत संघाकडून आकाश पाटील, युवराज गावडे यांचे प्रयत्न अपुरे पडले.