Santosh Deshmukh- राजीनामा कसला मागता, बडतर्फ करा! धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून अंजली दमानिया यांची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या कराड गॅंगने अक्षरश: क्रूकरतेची सीमा ओलांडली. याप्रकरणात अनेक राजकारण्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र दोन महिन्यांनंतर मंगळवारी मुख्यमंत्र्यानी धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला. ‘एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत. का अजित पवार यांना राजीनामा द्यायला भाग पाडतात. यांना बडतर्फ करा. असा मंत्री नको, हे आदेश द्यायला दोन मिनिटे नाही लागली पाहिजे, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला.

थर्डक्लास कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळतेय


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्याना खडेबोल सुनावले. कंटाळा आलाय मला आता या राजकारणाचा. राग येतोय, चीड येतेय. मला असं वाटतयं की आता प्रेम, भावना, संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारण्यांच्या. या सगळ्यांना याच्यात काय आहे हे माहित होतं. यामध्ये व्हिडीओ, ऑडिओ, फोटो काय आहेत हे माहितं होतं. तरी एवढे दिवस त्या थर्डक्लास कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट? त्याला अजूनही स्पेशल चहा, जेवण, त्याला हातकड्या नाही, का नाही? मला खरचं कळतं नाही. राजीनामा वगरे जाऊ द्या. मला असं वाटतय या माणसाला बडतर्फ करा, असे म्हणताना अंजली दमानिया यांना अश्रू अनावर झाले.

हे एवढे दिवस सुरू आहे. मला प्रचंड लोकांचे मॅसेज आले . सगळे लोकं रडत आहेत. माध्यमांचे रिपोटर्स रडतायत. आणि आपलं शासन इतकं निष्ठूर, अमानविय झालंय आता की त्यांना अजूनही यात राजकारण करायचंय. अजूनही राजीनामे घ्यायचे आहेत. कालपासून असंख्य लोकांचे मॅसेज आलेत की रात्री झोप लागली नाहीए, या प्रकरणामुळे संपूर्ण महारष्ट्र हादरला आहे, असे त्या म्हणाल्या.

धनंजयचा सकाळी मला अडीच वाजता मॅसेज आलाय. ताई मला बघवत नाहीए हे सगळं. मी काहीतरी निर्णय घेणार आहे. मी सकाळी त्याच्याशी बोलले. की धनंजय असं करू नको. शांत रहा तू, आत्तापर्यत इतकं संयमाने लढलायस आता तरी शांत रहा. तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे. सगळी मुलं, सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे. तो रडतोय, सगळेच रडतायत, पण शासनाला अजूनही वाट बघायचीए त्यांच्या राजीनाम्याची. वाव..! मला काय बोलाव खरचं कळत नाहीए, असे त्या यावेळी म्हणाल्या.

अजित पवार तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यांच्यासारखे वागा

10 वर्ष संघटीत गुन्हेगारी यांच्या माणसाने केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले आहेत. कसला राजीनामा. का मुख्यमंत्र्याला एका ओळीत सांगता .येत नाहीए की, हा मंत्री मला नको. आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील. आता याच्यापुढे पुराव्यांची गरज आमच्याकडून ठेवू नका. आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे पुरावे मांडतो. आधी म्हणता पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही, मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही. तुम्ही काय लॉर्ड लागलात आमचे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यांच्यासारखे वागा अजित पवार. तुम्हाला सगळे सांगतायत, पुरावे दिलेत आणून तरीसुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत. बस झालं आता तुमच घाणीचं आणि गलीच्छ राजकारण, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले.

क्रौर्याची परिसीमा, संतोष देशमुखांच्या मरणयातना पाहून महाराष्ट्र सुन्न! आरोपपत्रात व्हिडीओ अन् फोटोंचा समावेश