
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्यायालयात आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब सादर करण्यात आला आहे.अंजली दमानिया यांनी आरोपी सुदर्शन घुले यांचा जबाब अपूर्ण आहे. त्यात सगळे लपवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे? असा आरोप अंजली दमानिया यांनी करत या जबाबावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, एका स्टँडर्ड फॉर्मेटसारखा तिघा आरोपींचा कबुली जबाब आहे. खुनानंतर त्यांनी पळून जायचं कस ठरवलं, कोणी मदत केली, कुठे गेले, कृष्णा आंधळे कधीपर्यंत त्यांच्या बरोबर होता, कुणाच्या सांगण्यावरून ते पळाले, या काळात कराडशी बोलणं झाला की नाही, मुंडेंनी मदत केली का? ते कुठे कुठे पळाले, भिवंडीला किती दिवस थांबले होते, कोणी पैसे पोहोचवले, मग ते पुण्यात कसे आले, कोणी यायला सांगितलं ? कृष्णाला त्यांनी काय केले? सिद्धार्थ सोनवणे वेगळा कसा आणि कधी झाला ? डॉ. वायबसे यांनी कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचवले ? हे काहीच न्यायालयासमोर आलेल्या नाही. त्यांचा जबाब अपूर्ण असून त्यातून अनेक बाबींचा उलगडा झालेला नाही, असे दमानिया म्हणाल्या.
सुदर्शन घुले हे त्यांच्याबरोबर नव्हते आणि त्यांना अटक काही काळानंतर झाली होती. सुदर्शन घुले यांनी हत्येनंतर काय केलं ? याचा त्या जवाबात कुठेही उल्लेख नाही. ते गेले कुठे राहिले? भिवंडीत नेमके किती दिवस होते ? पुण्यात किती दिवस होते ? त्यांना मदत कोणी केली ? कराड यांच्याशी संभाषण झालं की नाही काहीही जबाबात लिहिलेलं नाही, याची माहिती त्यात नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
घटनाक्रमाची सुरुवात खंडणीपासून झाली होती, सुरुवात 8 ऑक्टोबर पासून झालेली नाही.पहिला एफआयआर आवादा कंपनीचा मे महिन्यात झाला होता. 28 मे रोजी अवादाच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं होतं. तुझे हातपाय मोडू आणि तुला म्हणजे जीवे मारू अशा ज्या धमक्या देऊन त्याचे अपहरण करण्यात आलं होतं, ते 28 मे ला झालं आहे. जून महिन्यात धसाच्या आरोपाप्रमाणे सातपुडा बंगल्यात खंडणीची बोलणी झाली होती.
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा खटला हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, जर ते लग्न झालेले असेल तर त्यांनी पुरावा द्यावा. जर पुरावे दिले तर धनंजय मुंडे यांचे आमदारकी रद्द होईल असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.