कराडला शासकीय अंगरक्षक कसा? अंजली दमानिया यांचा सवाल

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ‘मोक्का’ लावण्यात आलेला वाल्मिक कराड हा शंभर गुन्हे करूनही राजेशाही थाटात बीडमध्ये वावरत होता. त्याच्या दिमतीला सरकारी माणसे असायची असेही समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गंभीर गुन्हे दाखल असतानाही वाल्मीक कराडला शासकीय अंगरक्षक कसा, असा सवाल दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून काही प्रश्न विचारले आहेत. वाल्मीक कराडला शासकीय अंगरक्षक होता का, असा पहिला सवाल करतानाच इतर अनेक उपप्रश्नही त्यांनी नमूद केले आहेत.