करुणा मुंडे यांना सुरक्षा द्या, त्या धनंजय मुंडे यांचा पर्दाफाश करणार – अंजली दमानिया

पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीत आका आहेत. माझ्याकडे सर्वांचे पुरावे आहेत, असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत. धनंजय मुंडे यांची पोलिटिकल पॉवर वापरून आका जमनी बळकावतात, असा आरोपही त्यांनी केला. लवकरच आकांची नावे सांगणार, असा थेट इशारा त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना दिला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, पर्दाफाश करणार असतील, तर करून मुंडे यांना सुरक्षा देण्यात यावी, असं त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया म्हणाल्या की, ”करुणा मुंडे यांनी काल अनेक गोष्टींवर भाष्य केलं. ते ऐकून भीती वाटत आहे. त्या म्हणाल्या आहेत की, पुढे जाऊन मी सगळ्यांचा पर्दाफाश करणार आहे. मला असं वाटतं त्यांना पोलीस सुरक्षा दिली पाहिजे, कारण त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट व्हायला नको.”