
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर पहिल्यांदाच वन सेवेतील महिला अधिकाऱयाची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील या 2010 च्या बॅचच्या अधिकारी असून त्या भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रामध्ये नेमणूक झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.