अनिल सिंग यांची अतिरिक्त सॉलिसिटरपदी नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अनिल सिंग यांची चौथ्यांदा अतिरिक्त सॉलिसिटरपदी केंद्र सरकारने निवड केली आहे. अनिल सिंग यांनी यापूर्वी 9 वर्ष अतिरिक्त सॉलिसिटर म्हणून काम पाहिले आहे. अनिल सिंग हे गेल्या 40 वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहेत.