
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे अॅड. अनिल परब आणि शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांची सभागृहाला ओळख करून दिली. अनिल परब यांचा 27 जुलैला कालावधी संपणार आहे. परंतु, अधिवेशन 12 जुलैला संपणार असल्याने मुदतीपूर्वीच परब यांनी सोमवारी 8 जुलैला उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. सोमवारी शिवसेनेचे ज. मो. अभ्यंकर आणि भाजपचे निरंजन डावखरे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.