माझ्यावर धाड टाकून मला अटक करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच दिल्लीच्या मदतीने माझ्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे असा आरोपही देशमुख यांनी केला.
एक्सवर पोस्ट करून अनिल देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वीची घटना उकरुन काढून माझ्याविरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. चार वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे असे देशमुख म्हणाले.
तसेच माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुन महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले. त्यांना सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहेत असेही देशमुख यांनी नमूद केले.