शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते–खासदार अनिल देसाई, संघटनेच्या कार्याध्यक्षपदी आमदार सुनील शिंदे तर सरचिटणीसपदी दिनेश बोभाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघ ही संघटना शिवसेना अंगीकृत अखिल भारतीय पातळीवरील हिंदुस्थानातील सर्व राज्यात विस्तारलेली मान्यताप्राप्त संघटना असून एलआयसी, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, न्यू इंडिया इश्युरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स तसेच ईसीजीसी व इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियासहित खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांत कार्यरत आहे.
भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघ मध्यवर्ती कार्यकारिणी
अध्यक्ष ः शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई कार्याध्यक्ष – आमदार सुनील शिंदे, शरद जाधव, सुरेश नार्वेकर, संजय शिर्के
सरचिटणीस ः दिनेश बोभाटे कार्यकारी चिटणीस – महेश लाड, गोपाळ शेलार, अजय दळवी, संजीवकुमार डफळ, सचिन खानविलकर, अंकुश कदम. वरिष्ठ उपाध्यक्ष – श्रीकांत खानोलकर, अशोक रेड्डीज, शरद एक्के, हेमंत मोरे, शेखर वडके, श्रीकांत वैद्य (नागपूर), अजित रानडे (नागपूर).
उपाध्यक्ष ः श्रीधर पाथरे, अजय गोयाजी, हेमंत म्हात्रे, मंगेश कदम, राजेंद्र पांजरी, शरद नानल, चंद्रकांत हावळे, वृषाली मांजरेकर, हेमंत सावंत, नितीन विखार, आर. सुरेशकुमार (बेंगलोर), उमेश शुक्ला, प्रताप चव्हाण, संजय पाटकर, परेश विचारे, उदय साळवी, बसवराज नुची (बेंगलोर), ललित महाजन (दिल्ली), सुरेश शर्मा (लुधियाना), अशोक मिना (जयपूर), शर्वरी शेटये, मुकेश दुबे (भोपाळ), राजा मुखर्जी (कोलकाता), बी. डी. मोटा, बिपिन नवसारीवाला, काwस्तुभ कुलकर्णी, सिद्धेश भांगे, जगन्नाथ ब्रीद, शशिकांत भुवड, मनोज कोळी.
चिटणीस ः आल्हाद नाईक, अजय पथ्रोड, संजय सावंत, नितीन विखार, दीपक मोरे, मिलिंद सारंग, संतोष चांदे, सचिन हलनोर (पुणे), महेश कदम, संजय माने, समीर भिडू, सुबोध सावंत, संजय चेवले, सुनील भोसले, अनंत वाळके, प्रीती पावसकर, शिल्पा शिंदे, जगदीश वेताळ, किरण चोरगे, आनंद कांबळी, समीर बांदिवडेकर, लक्ष्मीकांत चौडीये (छत्रपती संभाजीनगर), निलेश शेलार, निखिल कुलकर्णी (सातारा).
सहचिटणीस ः चंद्रकांत पाटील, विनोद येरुणकर, प्रशांत कांबळे, हरुण शेख, देवेंद्र शर्मा (शिमला), हरीश दुधरेजिया (राजकोट), अनुप वानखेडे (अमरावती), लक्ष्मी जोशी (आय.आय.आय), रवी मुळेकर, मनीष खेडेकर, उल्हास चव्हाण, विद्याधर सावंत, साधना मेश्राम.
खजिनदार ः सचिन लोके. सहखजिनदार ः अजिंक्य खांडेकर. कार्यालयप्रमुख ः ललित अत्तावर.