कांद्याचे भाव कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष असून या संतापाचा मंत्री नितेश राणे यांना तडाखा बसला. नाशिकच्या बागलाणमधील चिराई येथे नितेश यांचा सत्कार होणार होता. तिथे थेट व्यासपीठावर जात एका शेतकऱ्याने कांद्याची माळ नितेश यांच्या गळ्यात घातली. सत्काराच्या माळेआधी कांद्याची माळ नितेश यांच्या गळ्यात पडली. या शेतकऱ्याला धक्के देऊन व्यासपीठावरून उतरवण्यात आले.
संतप्त शेतकऱ्यानं नितेश राणेंना घातली कांद्याची माळ; शेतकऱ्याला धक्के देऊन व्यासपीठावरून उतरवले pic.twitter.com/HIV4nFxg7B
— Saamana Online (@SaamanaOnline) December 25, 2024