
कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱया आंगणेवाडी येथील भराडी मातेचा यात्रोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासनाने भाविकांची चोख व्यवस्था केली आहे. यात्रेसाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेकण्यात आला आहे.
- पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन आणि ओटी भरणे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दर्शनासाठी 9 रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.
- रविवारी 23 फेब्रुवारीला मोड यात्रेने या वार्षिक यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.