
आंध्रेप्रदेशातील एक विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. एका बायकोने चक्क आपल्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावले आणि त्यानंतर काही दिवसांनी दोघींनी मिळून नवऱ्याचे तिसरे लग्न लावल्याची घटना घडली आहे. सध्या ते चौघेही गाव आणि नातेवाईकांपासून दूर गेले असून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र या अनोख्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
विशाखापट्टनमध्ये अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील आहे. येथे एका महिलेने आधी नवऱ्याचे दुसरे लग्न लावले आणि त्यानंतर दोन्ही बायकांनी मिळून नवऱ्याचे तिसरे लग्न लावले. गुलेलु गावातील व्यक्तीने सगेनी पांडन्ना याने 2000मध्ये पर्वतम्मा नावाच्या महिलेशी लग्न केले होते. लग्नाच्या सात वर्षानंतर पर्वतम्मा हिच्या पतीने त्यांना मुलं नसल्याने अप्पलम्मा नावाच्या मुलीशी लग्न केले. सगेनी पांडन्ना याने पर्वतम्मानंतर अप्पलम्माशी लग्न केले. त्यांना एक मुलगा झाला. मात्र त्यानंतर त्यांना आणखी एक मुल हवे होते. आता पार्वतम्मासोबत अप्पलम्मा हिनेही आपल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. पंडन्ना याने आपल्या दोन्ही पत्नींना सांगितले की, त्याला किल्लमकोटा गावातील बंधावीधी येथील लव्या उर्फ लक्ष्मी आवडते. त्यानंतर दोन्ही बायका लक्ष्मीच्या घरी मागणी घालण्यासाठी गेल्या.
लक्ष्मीच्या वडिलांनीही लग्नाला होकार दिला. पंडन्ना यांच्या दोन पत्नींनी लग्नपत्रिका आणि त्यांच्या नावाचे फ्लेक्स छापले गेले. त्यावर आपल्या पतीच्या लग्नात आमंत्रित करण्यात आले होते आणि मोठ्या उत्साहात त्याचे लग्न लावून दिले. तिसरा विवाह 25 जून रोजी झाला. हा अनोखा विवाह आंध्र प्रदेशात तेव्हापासून चर्चेचा विषय राहिला आहे. अनेकांनी त्याला विरोधही सुरू केला. त्यामुळे पांडण्णा आपल्या तीन पत्नींसह गाव आणि नातेवाईकांपासून दूर गेले आहेत.