आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यात सीमेंट फॅक्टरीत  स्फोट

आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यात आज सीमेंट फॅक्ट्ररित झालेल्या स्फोटात 16 मजूर गंभीर जखमी झाले. पोलिसांनी मात्र स्पह्ट झाला नसल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावरून एक गरम पदार्थ पडल्याने मजूर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा स्पह्टच असल्याचे मजूरांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे कंपनीकडून मजूरांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचेच उघड झाले आहे.