परीक्षेत कमी गुण मिळाले, भविष्याच्या चिंतेतून पित्याने दोन मुलांना संपवून स्वतःची जीवनयात्रा संपवली!

परीक्षेत कमी गुण मिळाल्याने भविष्याच्या चिंतेतून एका व्यक्तीने आपल्या दोन चिमुरड्यांची हत्या करून स्वतः जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनममध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मयत इसमाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

व्ही. चंद्रकिशोर हा ओएनजीसीमध्ये नोकरी करत होता. तो पत्नी आणि 8 वर्ष आणि 5 वर्षाच्या दोन मुलांसह विशाखापट्टनममध्ये राहत होता. चंद्रकिशोर दोन्ही मुलांना परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तो चिंतेत होता. कमी गुण मिळाल्याने मुलं भविष्यात मुलं स्पर्धेत कसे टिकणार, या विवंचनेत चंद्रकिशोर होता.

याच विवंचनेतून त्याने पत्नी घरी नसताना दोन्ही मुलांना पाण्याच्या बादलीत बुडवून संपवले. त्यानंतर स्वतः गळफास घेत जीवन संपवले. पत्नी घरी परतली तेव्हा आतले दृश्य पाहून तिला धक्काच बसला. मृत्यूपूर्वी चंद्रकिशोरने सुसाईड नोट लिहित मुलांच्या भविष्याच्या चिंतेतून आपण हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.