आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तळीराम दारूच्या बाटल्या पकडण्यासाठी धाव घेताना दिसत असून पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
गुंटूर येथील एतुकुरु रोडवरील डंपिंग यार्डमध्ये जप्त केलेली अवैध दारू पोलीस नष्ट करत होते. दारूच्या बाटल्या क्रश करण्यासाठी त्या रांगेत रचण्यात आल्या होत्या. पोलीस अधिकारीही तिथे उपस्थित होते. मात्र तळीरामांना त्याची खबर लागताच ते सारे दाखल झाले आणि दारूच्या बाटल्या अधिकाऱ्यांसमोरच पळवू लागले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र कुणी ऐकायला तयार नाही असं व्हिडीओमधून दिसत आहे.
विविध प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या 50 लाख रुपयांच्या अवैध दारूची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत अधिकारी असताना ही घटना घडली.