Andhra Pradesh Accident – बसची लॉरीला धडक, 8 ठार; 33 जण जखमी

आंध्र प्रदेशात बस लॉरीला धडकल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले असून 33 जण जखमी झाले आहेत. चित्तूर-बंगळुरु महामार्गावर शुक्रवारी ही घटना घडली.

चित्तूर जिल्ह्यातील मोगिली घाटाजवळ चित्तूर-बंगळुरू महामार्गावर तिरुपतीहून बेंगळुरूला जाणारी आंध्र प्रदेश प्रादेशिक राज्य परिवहन महामंडळाची बस एका लॉरीला धडकली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घटनेचा आढावा घेतला. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे चित्तूरचे जिल्हाधिकारी सुमित कुमार यांनी सांगितले.