मुंबईत रविवारी रात्री बीएमडब्ल्यू चालकाला गाडी चालवताना अचानक फीट आल्याने गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात एक दुचाकी आणि दोन रिक्षांना धडकून झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडवर हा अपघात झाला आहे. रोडवरुन बीएमडब्ल्यू कार चालकाला अचानक फिट आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कारने दुचाकीसह दोन रिक्षांना जबरदस्त धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
हा अपघात रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास डीएनननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसिक नगर बस स्टॉपवर घडली. या घटनेची माहिती मिळताच डीएननगर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना आणि फिट आलेल्या कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.