बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या सिझलिंग फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये अनन्या पांडेने स्ट्रीप साडी नेसलेली दिसत असून त्यावर खऱ्या मोगऱ्याच्या फुलांनी बनवलेला ब्लाउज घातला आहे. तिचा ब्लाउज चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे. या लूकमध्ये अनन्या खूपच बोल्ड दिसत आहे.
या लुकसह अभिनेत्रीने तिचे केस कुरळे केले आहेत आणि हलका मेकअप केला आहे. फोटो शेअर करताना अनन्याने कॅप्शनमध्ये पांढऱ्या बदकाचा इमोजी दिला आहे. तिच्या या सिझलिंग लूकचे चाहते प्रचंड कौतुक करत आहेत.
‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या सिनेमातून करिअरची सुरुवात केली, तिच्या अभिनयासोबतच अनन्या तिच्या लूकसाठीही इंटरनेटवर लोकप्रिय आहे.
अनन्या लवकरच ‘चांद मेरा दिल’मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.