अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे संपन्न होत आहे. या विवाह सोहळ्याकरीता देश-विदेशातून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत आणि राधिका या दोघांच्या विवाहपूर्व विधींचे विविध सोहळे झाले. त्यानंतर आज अखेर विवाह सोहळा संपन्न होत आहे. राधिका अनंतच्या लग्नाने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते.