लोकलच्या पहिल्या वर्गाच्या कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशावर दगड भिरकावल्याची घटना घडली आहे. दगड लागल्याने एक प्रवासी जखमी झाला आहे. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार नायगाव येथे राहतात. बुधवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. रात्री कामावरून घरी जाण्यासाठी त्यांनी मालाड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 येथून भाईंदर लोकल पकडली. ते प्रथम वर्गाच्या कोचमधून प्रवास करत होते. ती लोकल भाईंदर असल्याने ते दहिसर येथे उतरणार होते. दहिसर स्थानकात उतरायचे असल्याने ते दरवाजाजवळ आले असता अज्ञात व्यक्तीने भिरकावलेल्या दगडामुळे ते जखमी झाले.