भूकंप पाकिस्तानात धक्के दिल्लीत, रिश्टर स्केलवर 5.8 तीव्रता

बुधवारी पाकिस्तानात 5.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर संपूर्ण दिल्ली आणि उत्तर हिंदुस्थानच्या बहुतांश भागात सौम्य हादरे जाणवले. इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील करोरपासून 25 किमी दक्षिण-पश्चिमेला होता.

उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-कश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानलाही भूकंपाचा धक्का बसला.

दोन आठवड्यांत ही दुसरी वेळ आहे जेव्हा दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 29 ऑगस्ट रोजी, 5.7 तीव्रतेचा भूकंप अफगाणिस्तानात बसला होता.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भूकंपाच्या वेळी छताचे पंखे, खुर्च्या आणि इतर वस्तू काही सेकंदांपर्यंत थरथरताना दिसत आहेत.