
आणखी 116 बेकायदा स्थलांतरित हिंदुस्थानींना घेऊन अमेरिकन विमान अमृतसर विमानतळावर आज रात्री उशिरा दाखल झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांची पुन्हा हिंदुस्थानात पाठवणी करण्याची घोषणा केल्यापासून हिंदुस्थानात पाठवण्यात आलेली बेकायदा स्थलांतरितांची आज दाखल झालेली दुसरी तुकडी आहे. विमानातून आपले नातेवाईक येणार या विचाराने विमानतळाबाहेर मोठय़ा संख्येने नागरिक थांबून होते.