
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि हीमॅन धर्मेंद्र यांनी यापूर्वी कधीही प्रसिद्ध न केलेले दिवंगत अभिनेते भारत कुमार ऊर्फ मनोज कुमार यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आणि त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी जागवल्या. अमिताभ बच्चन यांनी मनोज कुमार दिग्दर्शित आणि अभिनीत ‘रोटी कपडा और मकान’ या सिनेमात काम केले होते. त्यावेळचे फोटो अमिताभ बच्चन यांनी शेअर केले.