अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा येथील आपला डय़ुप्लेक्स अपार्टमेंट विकला आहे. हा अपार्टमेंट क्रिस्टल ग्रुपच्या द अटलांटिस प्रोजेक्टमधील आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 31 कोटी रुपयांना खरेदी केलेला हा अपार्टमेंट 2025 मध्ये 83 कोटी रुपयांना विकला आहे. या अपार्टमेंटसाठी 5 कोटी रुपयांची स्टँप डय़ुटी आणि 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क मोजण्यात आले आहे. याआधी हे अपार्टमेंट अभिनेत्री कृती सेनन हिला भाड्याने दिले होते.