
‘जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे!’ अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी आपल्या उत्तराधिकारीबद्दल भाष्य केले आहे. अमिताभ यांच्या या ‘एक्स’वरील पोस्टने अनेक चर्चांना उधाण आले आहे. अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यात म्हटले की, ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे. पूज्य बाबूजी के शब्द’ असे म्हटले आहे. अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींबद्दल भाष्य करत असतात. याआधीही त्यांनी अभिषेक बच्चनविषयी एक पोस्ट शेअर केली होती. नुकताच अभिषेक बच्चनचा ‘बी हॅप्पी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांना अभिषेकचे काम खूप आवडत आहे. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या मुलाला मिळत असलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया दिली होती. अभिषेकच्या ‘बी हॅप्पी’ चित्रपटाला मिळालेल्या कौतुकाने मी भारावून गेलो आहे. वडिलांसाठी यापेक्षा अभिमानाची गोष्ट दुसरी काहीही असू शकत नाही, असे बिग बी यांनी म्हटले होते.