
राजस्थानातील जैसलमेरमध्ये लोक अमिताभ बच्चन यांना आपला देव मानतात. बिग बींच्या आगमनाने त्या शहरातील दुष्काळ संपला. त्यानंतर लोक त्यांचे पाय स्पर्श करण्यासाठी रांगा लावत होते, असे वक्तव्य दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी केले. पॉडकास्टवर अपूर्व लाखिया म्हणाले, ‘‘अभिषेक बच्चन आणि मी जैसलमेरमध्ये ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्या वेळी तिथे दुष्काळ होता. अमिताभ बच्चन गाडीतून उतरले आणि अभिषेकला मिठी मारताच पाऊस सुरू झाला. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या.’’