अमित शहा यांच्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतच्या वक्तव्याचे पडसाद; औराद येथे ‘रास्ता रोको’

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे संपूर्ण देशभरातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्या वक्तव्याविरोधात देशभरात निदर्शने आणि आंदोलने होत आहेत. औराद शहाजानी येथे ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन करत निषेध करण्यात आला.

सत्तेत असलेले भाजपचे केंद्रीय गृहमंत्री यांनी भर संसदेत संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अवमानकराक वक्तव्य केले.त्याचा देशभरात तीव्र विरोध होत आहे. औराद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले. जनतेने आपल्या भावना व्यक्त करत निषेध नोंदविला. या आंदोलनात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख लखन बोंडगे तर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने लक्ष्मण कांबळे तर काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल मोरे , विलास कांबळे , अभय साळुंके यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी अभय साळुंके , विलास कांबळे , बालाजी भंडारे , हाजी सराफ , रविंद्र गायकवाड , जिवन कांबळे , अमर मदाळे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख लखन बोंडगे , गोविंद मोरे , पवन स्वामी , सुनिल भोई तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्मण कांबळे , अमर गायकवाड , सिद्दीक मुल्ला व शेकडो दलीत बांधव व संविधान प्रेमी उपस्थित होते.