अमित शहांच्या रायगड दौऱ्याचा शेकडो शिवभक्तांना फटका; दोन तास कोंडले, पाण्याअभावी प्रचंड हाल, भोवळ येऊन अनेकजण कोसळले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर होते. यावेळी अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. यामुळे रायगडावर मोठा बंदोबस्त होता. पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. अमित शहांनी यावेळी उपस्थितांशी संवादही साधला. पण अमित शहांच्या या दौऱ्याचा फटका शेकडो शिवभक्तांना बसला आहे. यामुळे शिवभक्त संतप्त झाले आहेत.

अमित शहांच्या दौऱ्यासाठी खारपाडा ते कशेडी वाहतूक उद्या बंद

अमित शहांच्या रायगड दौऱ्यामुळे मोठी सुरक्षा व्यवस्था होती. सुरक्षेमुळे रायगडावर जाणाऱ्या शेकडो शिवभक्तांना रोखण्यात आले. शिवभक्तांना राजसदरेवर दोन तास कोंडले होते. कडक उन्हामुळे अनेक शिवभक्तांची प्रकृती बिघडली. शेकडो शिवभक्तांचे पाण्याअभावी प्रचंड हाल झाले. अनेकजण भोवळ येऊन कोसळले. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि निष्काळजीपणाचा फटका शिवभक्तांना बसला. यामुळे शिवभक्तांनी संताप व्यक्त केला.

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मिंध्यांचा भाजपला फुसका दम, म्हणे गोगावलेंना डावलले तर उठाव होईल

विशेष म्हणजे नवी मुंबईत खारघरमध्ये दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा झाला होता. कडकडीत उन्हात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. एप्रिलमध्ये कार्यक्रम भर उन्हात हा कार्यक्रम झाला होता. त्यावेळेसही अमित शहा प्रमुख पाहुणे होते. हा एक विचित्र योगायोग आहे.