Pahalgam Terror Attack – पीडित कुटुंबीयांचा आक्रोश, अमित शहांसमोर महिलांनी टाहो फोडला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पीडित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पीडितांचा आक्रोश हा मन हेलावणारा आणि हृदय पिळवटून टाकणारा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी पीडितांनी, महिलांनी अमित शहांसमोर टाहो फोडला, आक्रोश केला.

हेच ते क्रूरकर्मा दहशतवादी! पर्यटकांना ठार मारणाऱ्या संशयित दहशतवाद्यांचा फोटो प्रसिद्ध

पहलगाम हल्ल्यातील मृतांचे पार्थिव श्रीनगरमधील पोलीस कंट्रोल रुमच्या परिसरात ठेवण्यात आले आहेत. अमित शहा यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पीडित कुटुंबीयांचे अमित शहांनी सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित कुटुंबीयांनी शोक केला, पीडितांनी टाहो फोडला. पीडित महिला धाय मोकलून रडत होत्या, पुरुषांच्याही अश्रूंचा बांध फुटला. त्यांच्या वेदना आणि दुःख हृदय पिळवटून टाकणारे होते. अमित शहा यांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पीडितांनी आक्रोश केला. पीडितांचा हा आक्रोश एनएनआयच्या व्हिडिओतून समोर आला.

पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, कपिल सिब्बल यांची केंद्र सरकारकडे मागणी