अमित शहा यांच्या निषेधार्थ दापोलीत आंबेडकरी जनता उतरली रस्त्यावर

परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करत आज दापोलीतील आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. अमित शहा यांची देशाच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शाह यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी आंबेडकरी नेत्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी कार्यकर्ते जमले होते, तसेच त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केलं.