पाकिस्तानींना शोधून हद्दपार करा,  अमित शहा यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोनवर सूचना;  पाकिस्तानातील हिंदुस्थानींना मायदेशी परतण्याचे आवाहन

आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढून त्यांना हिंदुस्थानातून हद्दपार करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना केली. शहा यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक फोन करून संवाद साधला. पाकिस्तानात गेलेल्या हिंदुस्थानींना लवकरात लवकर मायदेशी बोलवा, अशी सूचनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. पहलगाम  हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा तात्काळ रद्द केले आहेत. देश सोडण्यासाठी दिलेली 48 तासांची मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे आता देशातील पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना हद्दपार करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.