
गुढीपाडवा म्हणजे हिंदु नववर्ष. या नववर्षाच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. तसेच घरोघरी गुढी उभारून गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याला विशेष आकर्षण म्हणजे शोभायात्रा. मुंबईतही विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात. या सर्व शोभायात्रेत गिरवागवची शोभायात्रा ही चर्चेचा विषय असते. यंदाही गिरगावची शोभायात्रा चर्चेचा विषय ठरली आहे.
कोणी काय खावे किंवा खाऊ नये, हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र, सध्या राज्यात कोणी काय खावे, यावर वक्तव्ये करत विनाकारण वाद लावत जातीय किंवा समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. याच विषयावर गिरगावच्या शोभायात्रेतील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेच्या फलकावर लिहिले होते की, ‘आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार.’,या फलकाने मराठी बाणा दाखवला असून राज्यात कोणत्याही वादाला थारा नसल्याचे दाखवून दिले आहे.