अमेरिकेत टेस्लाविरोधात लोक रस्त्यावर

सरकारी खर्चात कपात करण्याच्या नावाखाली ट्रम्प सरकारमधील मंत्री उद्योजक एलॉन मस्क यांनी अनेक सरकारी संस्था बंद केल्या. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. परिणामी एलॉन यांच्याविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून दिसेल तिथे टेस्ला गाड्या पेटवून देत असल्याचे चित्र आहे. शनिवारी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून मस्क यांच्याविरोधात घोषणाबाजी करताना दिसले. केवळ अमेरिकेतच नाही तर ब्रिटन आणि अमेरिकासारख्या देशातील मस्क यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मस्क यांनी विभागाचे कामकाज सांभाळताना संवेदनशील माहिती मिळवली आणि सरकारी खर्चात कपात करण्याच्या बहाण्याने अनेक विभाग बंद केले. त्यातून हजारो लोक बेरोजगार झाले. त्यामुळे मस्क यांच्याविरोधात अमेरिकेत निदर्शने सुरू झाली आहेत. लाखो कुटुंबांवर ट्रम्प यांच्या धोरणाचा परिणाम झाला.

विविध ठिकाणी शोरूमबाहेर आंदोलने

शनिवारपासून अमेरिकेत विविध ठिकाणी तब्बल 270 शोरूम आणि केंद्र येथे बाहेर आंदोलने सुरू आहेत. टेक्सास, न्यू जर्सी, मेसाचुसेट्स, कनेक्टिट, न्यूयॉर्क येथे टेस्ला गाडय़ा पेटवून देण्यात आल्या. आंदोलनाशी निगडित अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. टेस्ला जाळा, लोकशाही वाचवा, अमेरिकेला मस्कपासून वाचवा अशा घोषणा देण्यात येत आहेत.