काय सांगता! 64 दिवसांनंतर सूर्योदय होणार

अमेरिकेतल्या अलास्कामधल्या एका शहरात थंडीच्या दिवसांत जवळपास दोन महिने सूर्यदर्शनच होत नाही. उटकिआगविक या शहरात आता दोन महिन्यांनंतर 22 जानेवारी रोजी सूर्योदय होईल. तोपर्यंत हे शहर अंधारात असेल. उटकिआगविक शहराला बॅरो असेही म्हणतात. शहरात अंदाजे पाच हजार नागरिक राहतात. भौगोलिक स्थान आर्क्टिक समुद्राच्या जवळ अलास्कात नॉर्थ स्लोप इथे आहे. उत्तर गोलार्धाच्या जवळ असल्या कारणाने या शहरात वर्षातले काही महिने सूर्यदर्शन होत नाही. शहरात 18 नोव्हेंबरला स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजून 27 मिनिटांनी सूर्यास्त झाला.