
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत सत्तेत परतल्यापासून बेकायदेशीर स्थलांतरितांवर सतत कारवाई केली जात आहे. आता अमेरिकन सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांना अल्टिमेटम दिलं आहे की, नोंदणीशिवाय 30 दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना दंड आणि तुरुंगवासासह कठोर शिक्षा भोगाव्या लागतील.
अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने (DHS) शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिकेत 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या परदेशी नागरिकांना सरकारकडे नोंदणी करावी लागेल. नियमांचे पालन न करणे हा गुन्हा आहे. ज्याचा परिणाम दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो.”
दरम्यान, अमेरिकेच्या या नवीन निर्णयाचा H-1B वर्क परमिट किंवा स्टुडंट व्हिसा सारख्या कायदेशीर व्हिसा धारकांवर तात्काळ परिणाम होणार नाही. मात्र जे बेकायदेशीपणे अमेरिकेत राहत आहे, त्यांना हे महागात पडणार आहे.