
मोबाईलचा पासवर्ड हा अनेकांसाठी जीव की प्राण ठरत आहे. पासवर्ड फक्त स्वतःलाच माहिती हवा, यासाठी अनेक तरुण आणि तरुणी वाट्टेल ते करायला तयार असतात. मोबाईलचा पासवर्ड गर्लफ्रेंडलाही कळायला नको, याची अनेक बॉयफ्रेंड विशेष काळजी घेत असतात. याचाच प्रत्यय अमेरिकेतील फ्लोरिडा येथे आला. एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडकडे मोबाईलचा पासवर्ड मागितला. परंतु, तरूणाने पासवर्ड देण्यास नकार दिला. तरुणीने पुन्हा पासवर्ड मागितल्याने या तरुणाने थेट समुद्रात उडी घेतली. जवळपास 7 मिनिटे पोहल्यानंतर तरूण समुद्राच्या किनाऱयावर सुरक्षीत पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेक यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
पोलिसांना समुद्र किनाऱयावर एक संशयित बोट दिसली. पोलिसांनी या दोघांकडे आपले ओळखपत्र मागितले. परंतु, तरुणाने ते दाखवण्यास नकार दिला. मुलीने मुलाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकत नव्हता. मुलीने बॉसला फोन करण्यासाठी त्याचा फोन घेतला व पासवर्ड मागितला. परंतु, मुलाने थेट समुद्रात उडी घेतली, असे व्हिडीओत दिसते.