घुबडांच्या सुरक्षेसाठीच मारणार 5 लाख घुबडं! अमेरिकेने का घेतला हा निर्णय? वाचा…

अमेरिकेतील जंगलांमध्ये पाच लाख घुबडांचा बळी घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या जंगलातून घुबडांच्या लहान आकाराच्या प्रजाती नामशेष होत आहेत. या घुबडांची घटती संख्या सध्या चिंतेचा विषय ठरली आहे. त्यामुळेच अमेरिकन वन्यजीव अधिकाऱ्यांनी घुबडांचे संरक्षण करण्यासाठी नवीन योजना आखली आहे.

अमेरिकेतील जंगालांमध्ये आक्रमकतेसाठी ओळखली जाणारी बॅरेड घुबडं नावाची घुबडांची प्रजाती आहे. ही प्रजाती प्रामुख्याने उत्तर अमेरिकेमध्ये आढळुन येते. या घुबडांच्या आक्रमकतेपुढे लहान आकाराच्या स्पॉटेड घुबडांच्या प्रजातींचा निभाव लागत नाही. त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. या स्पॉटेड घुबडांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या घुबडांच्या सुरक्षेसाठी अमेरिकन वन्यजीव अधिकाऱ्यांनी घुबडांच्या इतर आक्रमक प्रजातींना मारण्याची योजना आखली आहे. या योजनेमुसार सुमारे पाच लाख बॅरेड घुबडांना गोळ्या घालण्यात येणार आहेत. असे असले तरी काही जणांना ही योजना मान्य नाही, त्यामुळे ही योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.