चीनचे अमेरिकेवर 125 टक्के आयात शुल्क

चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्ध आणखी चिघळणार आहे. अमेरिकेने हिंदुस्थानसह विविध देशांवर लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काला 90 दिवसांची स्थगिती दिली, परंतु चीनवर 145 टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. त्याला चीननेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चीनने अमेरिकेवर 125 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी चर्चेची दारे खुली असल्याचे म्हटले होते.

सोने 93 हजारावर

व्यापार युद्धामुळे आज सकाळी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 3 हजार रुपयांनी वाढले. विविध शहरांमध्ये सोन्याचे दर सध्या 93 हजार 300च्या वर आहेत. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 85 हजार 610 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर 93 हजार 390 रुपयांवर पोहोचले आहेत.