अमेरिकेत गोळीबाराच्या दोन घटनांत 7 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील बार्ंमगहॅम येथील नाईट क्लबमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. हल्लेखोराने रस्त्यावर उभे राहून नाईट क्लबवर अंदाधुंद गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

याप्रकरणी पोलीस तपास करत असून, अद्याप एकाही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही. बार्ंमगहॅम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11.08 वाजता या नाईट क्लबवर झालेल्या गोळीबारात 9 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उपचार सुरू असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

पाच वर्षांच्या मुलासह तिघांची हत्या

अन्य एका गोळीबाराच्या घटनेत पाच वर्षांच्या एका मुलासह एक महिला व पुरुष अशा तिघांची हत्या करण्यात आली. बार्ंमगहॅममधील इंडियन समर ड्राइव्हच्या एका भागात कार अपघाताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गोळीबाराच्या खुणा असलेली कार सापडली. या कारमध्ये असलेले एक पुरुष, महिला आणि एक लहान मुलगा यांचा गोळय़ा लागून मृत्यू झाला होता. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.