US Air Strike – येमेनमधील तेल बंदरांवर अमेरिकेकडून हवाई हल्ला, 74 जणांचा मृत्यू; 171 जखमी

येमेनमधील रास एसा तेल बंदरावर अमेरिकेने गुरुवारी रात्री उशिरा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान 74 जण ठार आणि 171 जण जखमी झाले आहेत. बंदरावर लोक काम करत असताना हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) हल्ल्याची पुष्टी केली आहे.

हुथी बंडखोरांचे इंधन आणि आर्थिक संसाधने कमकुवत करणे हा या हल्ल्यामागचा उद्देश असल्याचे सेंटकॉमने सांगितले. अल-जझीराच्या वृत्तानुसार, हल्ल्यात बंदर आणि त्याच्या आसपासच्या परिसरांना विशेषतः लक्ष्य करण्यात आले होते. बंदर कामगार आणि ट्रक चालकांवरही हल्ले झाले.

रास इसा बंदर येमेनच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि मानवी मदत पुरवठ्यासाठी महत्त्वाचे आहे. देशाची 70 टक्क्यांहून अधिक आयात आणि 80 टक्के मानवतावादी मदत तेथून येते. हल्ल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली.