अमेरिकेची इराणवर कारवाई, हिंदुस्थानच्या दोन तेल कंपन्यांना फटका

अमेरिकेने इराणी तेलाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली आहे. त्यामुळे इराणी तेलाच्या वाहतुकीत सामील असलेल्या एक हिंदुस्थानी नागरिक आणि चार कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यातील तीन कंपन्या या हिंदुस्थानी आहे.

अमेरिकेने ज्या हिंदुस्थानी नागरिकार कारवाई केली आहे त्यांचे नाव जुगविंदर सिंह बराड आहे. बराड यांच्या अनेक शिपिंग कंपन्या असून त्यांच्याकडे 30 तेल आणि पेट्रोलियम टँकरचे जहाज आहेत.बराड यांचे जहाज इराक, इराण, युएई आणि ओमानच्या खाडीत इराणच्या पेट्रोलियच्या जहाजातून तेलाची वाहतूक करतात. त्यानंतर हे तेल इतर ग्राहकांकडे पोहोचवले जातात. बराड यांच्या ग्लोबल टँकर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पेट्रोकेमिकल सेल्स कंपनी बी यांचे मालक आहेत.