‘टीम इंडिया’ने प्रचंड मेहनत आणि जिगरबाज खेळीच्या जिवावर ‘वर्ल्ड कप’ जिंकला असताना भाजपकडून मात्र आपले नेते आणि बीसीसीआयचे खजिनदार आशीष शेलार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडल्याने आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. भाजपच्या प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध करीत भाजपच्या व्रेडिट घेण्याच्या भूमिकेचा निषेध केला. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलायला दिले नसल्याने त्यांनी सभात्याग केला.
विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी हिंदुस्थानने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यामुळे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष असलेल्या अॅड. आशीष शेलार यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडला. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेत मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱया खेळाडूंचे अभिनंदन केले पाहिजे, असा प्रस्ताव मांडला. मात्र सभापती यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना बोलू दिले नाही. या वेळी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर, विलास पोतनीस यांनीच्यासह सर्वच विरोधी पक्षाच्या आमदारांनी बोलू न दिल्याचा निषेध करीत सभात्याग केला.
दरम्यान, विधान परिषदेत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. खेळाडूंमुळे वर्ल्ड कप जिंकला असताना भाजपच्या नेत्यांचे अभिनंदन म्हणजे मेहनत करणाऱया देशाच्या खेळाडूंचा अवमान असल्याचेही ते म्हणाले.
मुंबईच्या साफसफाईसाठी नव्या कंपन्यांकडून काढलेली निविदा रद्द
मुंबईतील साफसफाईसाठी बृहन्मुंबई बेरोजगार फेडरेशन या संस्थेकडून आतापर्यंत सेवा घेतली जात होती. संस्थेतील 75 हजार कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी हे मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम करत होते. मात्र अचानक या संस्थेला डावलून मुंबई महापालिकेने मुंबईच्या साफसफाईसाठी नव्या पंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. यासाठी चार पंपन्यांनी निविदा पाठवल्या आहेत. मात्र त्या उघडण्यापूर्वीच या निविदा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी मांडत महापालिकेच्या या निर्णयामुळे 75 हजार बेरोजगार मराठी कर्मचाऱयांवर बेकारीची कुऱहाड कोसळेल. त्यामुळे या निविदा रद्द करून कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. ती मान्य करत उद्योग मंत्र्यांनी या निविदा रद्द करणार असल्याची घोषणा केली.