
जलसंधारण आणि जलसंपदा ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला तर निर्णय मोहितं कंबोज घेतो, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज विधानपरिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, ”दीपक कपूर नावाचे अधिकारी आहेत, ते मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणी सुद्धा पीत नाहीत. मंत्र्यांना माहित आहे की नाही, माहित नाही. पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा विभागात पान सुद्धा हलत नाही. कोण आहे हा मोहित कंबोज? ग्रामीण भागात धरणाचे नवीन प्रकल्प, वेगवगेळ्या पाण्याचे प्रश्न असतील या सगळ्याचे निर्णय कंबोज घेतो.”
मोहित कंबोज आणि दिपक कपूर यांचं सगळं संभाषण आणि सीडीआर तपासाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कंबोज आणि दिपक कपूर एकमेकांशी संवाद केल्याशिवाय महाराष्ट्रातले कोणतेही निर्णय होत नाहीत, असा आरोपही त्यांनी त्यांनी केला आहे.