बीडमध्ये एका सरपंचाची हत्या होते, राज्यात एक सरपंच सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच अजित पवार यांनी महायुतीत एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी केलं असेही दानवे म्हणाले.
आज माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी केलं. एकनाथ शिंदे यांचं सरकार असो वा नसो भाजपचं सरकार येणार हे स्पष्ट झालं होतं. तसेच बीडमध्ये सरपंचाची हत्या झाली, यावर दानवे म्हणाले की ज्या राज्यात एखादा सरपंच सुरक्षित नसेल तर एखादा सामान्य माणूस सुरक्षित असेल का? लोकांनी गप्प बसायचं का अशी परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे असेही दानवे म्हणाले.