मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. माध्यमांसमोर त्यांच्या बॅगा प्रशासनाकडून तपासण्यात आल्या. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. पण हा निव्वळ स्टंट असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन-तीन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले असताना हेलिकॉप्टरमधून अनेक बॅगा उतरवण्यात आल्या होत्या. यावरून मोठा वाद निर्माण झाला. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आलेल्या बॅगांची तपासणी यावेळी करण्यात आली. यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
रात्रीस खेळ चाले…मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये उतरवल्या पैशांच्या बॅगा
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले होते, त्या दिवशी बॅगा का तपासल्या गेल्या नाहीत? आता आरोप झाल्यानंतर ते बॅगांमध्ये काही घेऊन जातील का? ही सगळी नाटकबाजी आहे. त्या दिवशी बॅगा का तपासल्या नाहीत? याचं उत्तर तपास यंत्रणांनी द्यावं. त्या बॅगा आणल्यापासून कुठे गेल्या? याची तपासणी करावी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे तपास करावा. आरोप केल्यानंतर तपासल्याचं दाखवायचं. ही सर्व नाटकबाजी आहे. व्हिडिओ कॅमेरे तिथे कसे काय गेले? हे दाखवण्यासाठीच गेले. नेहमीची जी शोबाजी करत असतात, त्यांनी ती केली, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
नाशिक महापालिकेतील 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळय़ाचा पर्दाफाश, संजय राऊत यांचा पुराव्यांसह गौप्यस्फोट
आज जी काही तपासणी केली गेली हा निव्वळ स्टंट आहे. सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे. विमानतळावरून येताना हेलिपॅडवरून किंवा खासगीत येणाऱ्यांची अशा प्रकारे तपासणी करावी लागते. हा नियम आहे. त्यातून कोणालाच सुट नाही. देशाच्या पंतप्रधानांना नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही नाही, कोणत्याच पक्षाच्या नेत्यालाही सुट नाही. सर्वांच्या बॅगा तपासल्याच पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.