मजबूत संघटन बांधणी करून जोमाने कामाला लागा, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आवाहन

कोणी पक्षातून गेल्याने पक्ष संपत नसतो. पक्षाने अनेक वादळे पाहिली असून, त्यानंतरही पक्ष वेळोवेळी मजबुतीने उभा राहिलेला आहे. पक्षातील काही लोकांनी इतर पक्षात प्रवेश केल्याने पक्षातील जुने निष्ठावंत पदाधिकारी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका पक्ष अत्यंत नियोजनबद्ध व ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

जालना शहरातील मस्तगड येथील शिवसेना भवन येथे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आयोजित केलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज 14 फेब्रुवारी रोजी झाली. या बैठकीत जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला.

तसेच घनसावंगी, मंठा, परतूर, जालना येथील रिक्त पदांवर प्रभारी तालुकाप्रमुखांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख माधव कदम, मुरलीधर शेजूळ, भगवान कदम, रमेश गव्हाड, बाबूराव पवार, हनुमान धांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकी अगोदर व नंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला. परंतु कोणी पक्षातून बाहेर पडल्याने शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्ष बांधणी करून मजबुतीने उभे राहावे.

संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले की, पक्षांतराने रिक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागा तत्काळ भरल्या जाणार असून, पक्ष संघटन मजबूत केले जाईल. पक्षात अनेक निष्ठावंत इच्छुकांची मोठी यादी आहे. संघटनेतील प्रत्येक पदाधिकाऱ्यास न्याय देण्याची भूमिका पक्षाची असल्याने आगामी काळातही येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांत अनेकांना संधी दिली जाणार आहे. त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, नागरिक व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी सभापती अशोक आघाव, देवनाथ जाधव, महिला आघाडीच्या मंगल मेटकर, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, अशोक बर्डे, कुंडलिक मुढे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, विनायक चोथे, गणेश काळे, मधुकर साळवे, कुमार रुपवते, नंदकिशोर पुंड, संदीप कंटुले, प्रदीप बोराडे, जे. के. चव्हाण, प्रभाकर उगले, पंडित क्षीरसागर, रामजी गायकवाड, राजू जाधव, संदीप मगर, कारभारी म्हसलेकर, बबनराव मिसाळ, शंकर बेंद्रे, विष्णुपंत गिराम, परमेश्वर चंद, तुळशीदास काळे, वसीम पठाण, जनार्दन गिराम, ज्ञानोबा काकडे, अशोक राजेजाधव, संतोष खरात, नरहरी तांगडे, राजेंद्र तांगडे, प्रभू ब्रह्मे, रजनिश कनके, सुनील मिसाळ, श्याम राठोड, अर्जुन ठोंबरे, श्रीराम कान्हेरे, सुदाम काळे, कृष्णा खांडेकर, जीवन खंडागळे, शंकर जाधव, दीपक खरात, हरी शेळके, रमेश वऱ्हाडे, संदीप सदावर्ते, समाधान सवडे, संदीप काकडे, अंकुश पवार, मधुकर खरात, किसान राठोड, केशव क्षीरसागर, संजय जाधव, एन.डी. कडोस यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

आगामी काळ पक्षासाठी उज्वलच जिल्हाप्रमुख अंबेकर

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले असले तरी जिल्ह्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणावर त्यांना मतदान केले. हे विसरता येणार नाही. जिल्ह्यात अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली तरी सामान्य नागरिक पक्षाच्या विचारधारेला मानणारा असल्याने त्याने पक्षाला भरभरून मतदान केले. नुकत्याच घडलेल्या काही पक्षांतराच्या घटनांमुळे शिवसैनिकांनी खचून न जाता सामान्य नागरिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करावा व ते सोडविण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करावेत. एकजुठीने काम केल्यास आगामी काळ पक्षासाठी उज्ज्वलच असेल, असेही जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले.