Pahalgam Terrorist Attack – दहशतवाद्यांनी धर्म विचारून जीव घेतला, यांना ठेचलच पाहिजे – अंबादास दानवे

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला हा संतापजनक आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून जीव घेतला. या दहशतवाद्यांना तर ठेचलच पाहिजे, असा संताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांनी व्यक्त केला आहे.

अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर (X) पोस्ट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला हा संतापजनक आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून जीव घेतला. हे दहशतवादी तर ठेचले पाहिजेतच. पण यांना मदत करणाऱ्यांना पण वेचून वेचून यमसदनी पाठवायला हवे. काश्मिरात कलम 370 हटून पर्यटक वाढला असेल, पण त्याला सुरक्षा दिली जाणार नसेल तर, ही सगळी टाकलेली पाऊले व्यर्थ आहेत, असं ते म्हणाले आहेत.