
प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सुविधा तातडीने उपाययोजना करून उपलब्ध करून द्याव्यात. नसता शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकरणाऱ्या बँक व्यवस्थापकांना शिवसेना स्टाईलने समज दिली जाईल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.
गंगापूर, वैजापूर विधानसभा क्षेत्रातील 53 गावांच्या शेतकरी नागरिकांच्या व पक्षातील संघटनेतील कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज 28 मार्च रोजी मांजरी येथे जनता दरबार आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, अंकुश सुंभ, अविनाश पाटील, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, गटशिक्षणाधिकारी समाधान आराक, पोलीस स्टेशनच्या प्रतिनिधी उपनिरीक्षक अश्विनी कुंभार यांच्यासह इतर विभागातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर केलेल्या माहुली ते वैजापूर रोड रस्त्याचे लोकार्पण व बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते महादेव मंदिर मांजरी सिमेंट रोडचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. पक्षातील कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या त्यांच्या हस्ते करण्यात आल्या. शेतकऱ्यांना नांदूर मधमेश्वर प्रकल्पात अधिग्रहित करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला मिळाला नाही. पिक कर्ज बँक देण्यास टाळाटाळ करतात. पीककर्ज थकल्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड केली असून घरकुल लाभार्थ्यांना पैसे मिळत नसल्याच्या गावकऱ्यांनी दानवे यांच्यासमोर मांडल्या. सदरील समस्या व प्रकरणे तातडीने मार्गे लावून शेतकरी बांधवांना सहकार्य करावे, अशा सूचना दानवे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर सिंचन विहिरीचे कुशल बिल निघाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यावर शेतकऱ्यांचा हा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशी सूचना गटविकास अधिकारी यांना केली, शेतकरी व सामान्यांचे प्रश्न अधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावण्याचे वचन अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिले.
भूमी अभिलेख विभागातील अधिकारी कामात हलगर्जीपणा करत असल्याने आणि शेतकरी बांधवांना याचा मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने जन सामान्यांची कामे करण्याची सूचना त्यांनी केली. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटक लताताई पगारे, सचिन वाणी, तालुका संघटक मनोज गायके, उपतालुकाप्रमुख बाबासाहेब गव्हाणे, नागेश चौधरी, रविंद पोळ, विश्वंभर शिंदे, विभागप्रमुख पांडुरंग कापे, महेश लिंगायत विभागप्रमुख पांडुरंग कापे, महेश लिंगायत, श्रीलाल गायकवाड, दादासाहेब जगताप, सरपंच पुष्पाताई कसाने, अशोक कसाने, अप्पासाहेब मुळे, नारायण बाराहाते, बाबासाहेब सुंब, रमेश शेजुळ, सुभाष कोळसे, भास्कर कोळसे, पोपट पवार, राजू माघाडे, राहुल गायकवाड, शुभम बाराहाते, नवनाथ भुसारे, ऋषीकेश मनाळ प्रविण काळे, संतोष दंडे, अशोक यादव यांच्यासह पक्षातील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागेवर सोडण्यासारख्या असलेल्या समस्या तातडीने दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे वर्ग करून मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. रस्ते, वीज आणि पाण्याच्या प्रमुख समस्या नागरिकांनी यावेळी मांडल्या. जागेवर सोडण्यासारख्या नसलेल्या समस्या दानवे यांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून पुढील काही दिवसांत सोडविण्यासाठी सूचना करत संबंधित प्रकरणी घेऊन मी जिल्हाधिकारी यांच्या समवेत एक स्वतंत्र बैठक घेणार, असल्याची माहिती दानवे यांनी गावकऱ्यांना दिली. पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, बैंक, रस्ते, पाणीपुरवठा योजना या सर्व शासकीय कार्यालयांतील अडचणी नागरिक लेखी स्वरूपात घेऊन आले होते. मोठ्या संख्येने शेतकरी व अन्य नागरिक आपल्या समस्या घेऊन आल्याने प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत कामकाज होत नसल्याचे दिसून येत होते.
याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी पाटील मिसाळ, तालुका संघटक मनोज गायके, रमेश सावंत, बबन जाधव, नंदकिशोर जाधव, अरुण शेलार, किशोर हुमे, माणिक निघोटे, महिला आघाडी जिल्हा संघटक लताताई पगारे व तालुका संघटिका वर्षाताई जाधव, युवासेना जिल्हा युवाधिकारी विठ्ठल डमाळे पाटील, अधिकारी वृंद व पदाधिकारी उपस्थित होते.
आज गंगापूर मतदारसंघातील भेटीगाठी व बैठक 29 मार्च रोजी गंगापूर विधानसभा मतदारसंघातील विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भेटीगाठी घेणार आहेत. सकाळी 10 वाजता लासूर स्टेशन येथे लासुर, अंबेलोहळ, सिल्लेगाव, तुर्काबाद जिल्हा परिषद गटातील तर दुपारी 12.15 वाजता गंगापूर येथे गंगापूर शहर, जामगाव, शेंदूरवादा, वाळूज व रांजणगाव येथील शेतकरी व अन्य नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. दुपारी 3 वाजता बजाजनगर येथे संभाजीनगर पश्चिम ग्रामीण पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत बैठक व सायंकाळी 7 वाजता संभाजीनगर पश्चिम शहर पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.