अ‍ॅमेझॉनमध्ये वर्क फ्रॉम होम बंद

अ‍ॅमेझॉनमध्ये आता वर्क फ्रॉम बंद करण्यात आले आहे. सर्वांना कामावर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेस्सी यांनी आता कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवणे बंद केले आहे. ऑनलाइन बैठका रद्द करण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांना कामावर येऊन पूर्णवेळ काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी 2 जानेवारी 2025 पासून करण्यात येणार आहे. गरजेच्या नसलेल्या प्रक्रिया, बैठका, यंत्रणा यांच्यामध्ये वेळ न दवडता प्रत्यक्ष कार्यालयात येऊन काम करण्याला प्राधान्य द्यावे असे जेस्सी यांनी म्हटले आहे.

जगातील सर्वात मोठी साखळी

अ‍ॅमेझॉन ही जगातील सर्वात मोठी साखळी असून नवनवीन संकल्पना राबवून कंपनीचे काम आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी काम करूया असे आवाहनही कंपनीचे सीईओ अँडी जेस्सी यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.